निप्रदूषणामुळे बधिरता येऊ शकते. मोठा आवाज थोडाकाळ जरी टिकला तरी त्यामुळे नुकसान होते. तसेच मध्यम ध्वनिप्रदूषण सतत असले तरी कानाचे नुकसान होऊ शकते. आपल्या शहरांमध्ये विविध प्रकारचे ध्वनिप्रदूषण आणि गोंगाट वाढत असल्याने बधिरतेचा धोकाही वाढत आहे. आवाजाची तीव्रता जेवढी जास्त तेवढे नुकसान जास्त.
मोठया आवाजाने किंवा गोंगाटाने ध्वनिशंखातल्या पेशी खराब होतात. आधी शंखाच्या सुरुवातीच्या टोकाकडील पेशी खराब होतात. या ध्वनीपेशी परत निर्माण होऊ शकत नाहीत. या पेशी खराब झाल्याने वरचे स्वर टिपेचे स्वर आधी ऐकू येत नाहीत. नंतर नंतर खालचे (म्हणजे खर्जाचे) स्वरही ऐकू येत नाहीत.
काही वेळा हे नुकसान तात्पुरते असते व 2/3 दिवसांत भरून येते. संशोधनानुसार असे दिसते की ऍंटी-ऑक्सिडंट (गंजरोधक) उपचारांमुळे हे नुकसान लवकर भरून येते आणि कायमचे नुकसान टळते. कांदा, लसूण, फळे, ऍस्पिरिन, इ. पदार्थात हे गंजरोधक गुणधर्म असतात.
ध्वनिप्रदूषणाने नेमके कोणते नुकसान झाले आहे हे ऑडिओमेट्री (श्रवणमापन) तपासणीतच कळू शकते
काही उदाहरणे व अभ्यास
ट्रॅक्टर चालवणा-या शेतक-यांना अशा प्रकारची कर्णबधिरता येते असे आढळले आहे. अवजड कारखान्यात यंत्रसामग्रीचा मोठा आवाज होतो. तेथे हळूहळू सर्व कामगारांना काही प्रमाणात कर्णबधिरता होते असे आढळले आहे. कापड गिरण्यांमध्येही कामगारांना कर्णबधिरता होते असे आढळले आहे. एका अभ्यासात वाहतुक पोलिसांपैकी 76% पोलिसांना कर्णबधिरता आढळून आली. खाण कामगारांपैकी 12 % कामगारांना कर्णबधिरता आढळली. निरनिराळया अनेक उद्योगधंद्यात आवाजाचे प्रमाण खूप असते तिथे हा धोका असतोच (छपाई, बांधकाम, लाकूड मिल, लेथ मशिन, इ.)
भारतीय कामगार विमा संरक्षण कायद्यानुसार 1948 पासून कर्णबधिरता हा एक औद्योगिक आजार मानला गेला आहे. पण यासाठी भरपाई मिळायला 1996 साल उजाडायला लागले. अजूनही अशा केसेस कमीच आहेत.
ध्वनिगोंगाटापासून संरक्षण तीन युक्त्या (आवाज कमी करा, आवाज लांब ठेवा, बोळे घाला.)
गोंगाट-आवाजाचे प्रमाण कमी व्हावे म्हणून विविध प्रकारचे प्रयत्न करणे आवश्यक आहे.
भोंगे, हॉर्न, लाऊडस्पीकर हे सर्व गोंगाट निर्माण करतात. यांचा वापर कमीत कमी करणे हा एक मुख्य प्रयत्न असायला पाहिजे. कारखानदारीत गोंगाट कमी करण्यासाठी जाणीवपूर्वक प्रयत्न व सुधारणा कराव्या लागतात. पण तरीही गोंगाट निर्माण होतोच.
आवाजापासून लांब राहणे हाही एक उपाय आहे.
कानातून शिरणारा आवाज कमी करण्यासाठी तीन प्रकारची साधने संरक्षक म्हणून उपयोगी आहेत. कानाचे मफ, कानासाठी बूच, कागदाचे बोळे, बोटाने कान बंद करणे (तात्पुरते). ही साधने आपण सहज वापरू शकतो.
ध्वनिप्रदूषणाने बधिरता : लक्षणे व चिन्हे
ध्वनिप्रदूषणामुळे होणा-या नुकसानीचा अंदाज सहजपणे येत नाही. वेदना नसते त्यामुळे कमी ऐकू येणे हा एकमेव निकष असतो. यासाठी खालील खुणा लक्षात ठेवा.
मोबाईल किंवा टेलिफोनवरचे बोलणे न ऐकू येणे. टी.व्ही. किंवा रेडिओचा आवाज मोठा करून ऐकण्याची सवय इतर लोक आपल्याशी बोलताना ओरडून किंवा रागावून बोलतात असे वाटणे. कानात गुणगुण/सूक्ष्म ध्वनी एकू येत राहणे. इतर लक्षणेलक्ष लागणे/ एकाग्रता न होणे
- त्रागा करणे किंवा चिडखोरपणा वाढणे, थकवा
डोकेदुखी निद्रानाश
आवाजाचा थर्मामीटर
आवाजाची तीव्रता मोजण्याचे युनिट म्हणजे डेसिबल. आपण नाना प्रकारचे आवाज रोज ऐकत असतो. त्यातले काही साधे- सौम्य असतात तर काही भयंकर मोठे. काही आवाजांची आपल्याला सवयच होऊन जाते. मात्र 85 डेसिबल वरचे आवाज हानिकारक असतात.
0 Comments